शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे एका बंद घरात शंतनू नाना सोंडे या 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे काही युवक बसलेले असताना त्यांना येथील विठ्ठल सोंडे यांच्या बंद पडलेल्या खोलीमध्ये एका युवकाने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान युवकांनी पाहणी केली असता शंतनू नाना सोंडे (वय २३) रा. सोंडेआळी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत मंदार विजय शेंडे (वय २३) रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…