शिरूर तालुका

शिक्रापूरच्या कंपनीतून स्टील व प्लेटा चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील कामासाठी आणलेले स्टेनलेस स्टीलचे बार तसेच ॲल्युमिनियमच्या काही प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे अल्नाटेक प्रोपॅक सिस्टीम या कंपनीमध्ये कामासाठी लागणारे स्टेनलेस स्टीलचे बार व काही ॲल्युमिनियमच्या प्लेटा आणून ठेवलेल्या होत्या, कंपनीतील कर्मचारी कंपनी मध्ये काम करत असताना त्यांना सदर ठिकाणच्या काही प्लेटा व बार नसल्याचे दिसून आले त्याबाबत त्यांनी कंपनीचे एच आर मॅनेजर भरत दिघे यांना माहिती दिली असता त्यांनी कंपनीमध्ये पाहणी केली असता कोठेही सदर बार व ॲल्युमिनियमच्या काही प्लेटा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेल तपासले असता 2 युवकांनी कंपनीच्या भिंतीवरुन आतमध्ये उद्या मारुन कंपनीतील सदर साहित्य चोरुन नेल्याचे दिसून आले.

याबाबत भरत सोपानराव दिघे (वय ३२) रा. मोडकई वस्ती रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रवण गुपचे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

5 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

9 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

9 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

9 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

10 तास ago