शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी ता. शिरुर येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल असताना सदर व्यक्तीचा मृतदेह 2 दिवसांनी उरुळीकांचन येथे आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील तिरुपती बबनराव अन्नकाडे हा इसम सात डिसेंबर रोजी सकाळच्या सुमरास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबत जयश्री तिरुपती अन्नकाडे (वय ३५) रा. ग्रामपंचायत जवळ सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असता शिक्रापूर पोलिस पोलिसांकडून तपास सुरु असताना नऊ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उरुळीकांचन येथील प्रयागधाम हॉस्पिटल रस्त्याचे कडेला तिरुपती अन्नकाडे या व्यक्तीने गळफास घेतल्याचे काही नागरिकांना दिसले त्यामुळे तेथील पोलिसांनी चौकशी केली
सदर व्यक्तीबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…