‘आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला’ त्या बॅनरची रांजणगाव गणपती सह पंचंक्रोशीत चर्चा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतच्या पंचंवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक गावातील दिग्गजांचा पराभव झाला. यावेळेस प्रत्येक गावच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेत सोशल मिडिया तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत अनेक गावात सत्ताधाऱ्यांना चारिमुंड्या चित करत अस्मान दाखवले. सध्या रांजणगाव गणपती येथे लावण्यात आलेल्या अशाच एका बॅनरची रांजणगाव पंचंक्रोशीसह तालुक्यात चर्चा आहे.

रांजणगाव गणपती मध्ये तीन पारंपरिक विरोधकांनी एकत्र येत सत्तेसाठी मोट बांधली होती. त्यामुळे त्याची भल्याभल्यांनी धास्ती घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. परंतु शिवसेना (शिंदे गटाचे) युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष तसेच रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी विरोधकांच्या 6 नंबर वार्डातुन मी किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगनात उतरणार असल्याचे जाहीर करत पॅनल मध्ये एक नवचैतन्य निर्माण केले होते.

त्यानंतर वार्ड क्रं 6 मध्ये एकही उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नसताना बापुसाहेब शिंदे यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलत त्यांच्या पत्नी अर्चना शिंदे यांना वार्ड क्रं 6  मध्ये उभ केल. शिंदे यांचं स्वतःच त्या वार्डात एकही मतदान नसतानाही त्या चांगल्या मताधिक्याने निवडुन आल्या. विशेष म्हणजे वार्ड क्रं 6 मध्ये भिमाजी खेडकर आणि मानसिंग पाचुंदकर हे स्वतः राहत असल्यामुळे हा वार्ड त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. असं असतानाही अर्चना शिंदे यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या विजयाची सगळ्या गावासह तालुक्यात चर्चा आहे.

 

रांजणगाव गणपती येथील विरोधकांचे प्राबल्य असलेल्या वार्डात बापुसाहेब शिंदे यांची पत्नी उभी असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यातच तिन्ही विरोधकांनी एकत्र येत अर्चना शिंदे यांचा कसल्याही परिस्थितीत पराभव करायचाच असा चंगच बांधला होता. त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर केला. परंतु मतदारांनी मात्र अर्चना शिंदे यांच्याच बाजुने कौल दिला. त्यामुळे विरोधकांना अपयश आले. रांजणगाव गणपतीचे गाडा शौकीन तसेच उद्योजक अभिजित बत्ते आणि अक्षय बत्ते यांनी रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गावर “आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला” अशा अशा आशयाचा बॅनर लावला असुन सध्या रांजणगाव गणपती सह तालुक्यात या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.

रांजणगाव गणपती निवडणुक निकालानंतर बापूसाहेब शिंदे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेद्वारांची नावे पाहा…

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago