gram-panchayat-election

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीत कही खुशी कही गम; विजयी उमेद्वारांची नावे पाहा…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल आज (सोमवार) लागले असून, अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला. शिरुर तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव ग्रामपंचायत मध्ये मंगलमुर्ती ग्रामविकास पॅनलचे 14 तर विरोधी पॅनलचे 2 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आला. रांजणगाव मध्ये अटीतटीच्या लढतीत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या पत्नी अर्चना शिंदे आणि माजी उपसरपंच राहुल अनिल पवार हे विजयी झाले. सरदवाडी येथे माजी सरपंच विलास कर्डीले यांचा गणेश कारभारी सरोदे यांनी पराभव केला.

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 च्या प्रमुख विजयी उमेदवारामध्ये भाजपाचे दिवगंत नेते माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे जगदीश पाचर्णे, तर्डोबाची वाडी गावच्या सरपंचपदी निवडुन आले. सरदवाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव, शिरुर ग्रामीणच्या सरपंचपदी शिल्पा दिलिप गायकवाड, रांजणगाव गणपतीच्या सरपंचपदी सुवर्णा वायदंडे, कर्डेलवाडीच्या सरपंचपदी लता गणेश कर्डीले, रांजणगाव सांडसच्या सरपंचपदी प्रदिपा संभाजी रणदिवे निवडून आल्या.

प्रमुख विजयी उमेदवारा मध्ये रांजणगाव ग्रामपंचायत मध्ये श्रीकांत उर्फ बबलू पाचुंदकर, शिरुर ग्रामीण मध्ये माजी उपसरपंच बाबाजी वर्पे, संजय शिंदे यांचा तर सरदवाडी ग्रामपंचायतीतील उमेश सरोदे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये तर्डोबाची वाडीचे माजी सरपंच संभाजी कर्डिले, संजय पोटावळे तसेच रामलिंगचे माजी सरपंच तुषार दसगुडे यांचा समावेश आहे. रांजणगाव सांडस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजेंद्र बबन रणपिसे व विशाल विलास रणपिसे यांना ४१० अशी समसमान मते पडल्याने दोघाच्या नावाने चिठ्ठी काढण्यात आली त्यात विशाल विलास रणपिसे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली.

ग्रामपंचायत निहाय निकाल पुढीलप्रमाणे…

ग्रामपंचायत तर्डोबाची वाडी
जगदीश भागचंद पाचर्णे (लोकनियुक्त सरपंच)
पराभूत संभाजी बाजीराव कर्डीले

विजयी उमेदवार
लक्ष्मण तुकाराम कर्डीले
तज्ञिका रुपेश कर्डीले
संदीप वसंत पवार
आशा गणेश पाचर्णे
शोभा दशरथ गोऱ्हे
विवेक सुधाकर पाडळे
प्रज्योत वसंत पाचर्णे
मंगल पाटीलबुवा पाचर्णे
गुलाब राजेंद्र देवकाते
रेखा बाळकृष्ण पवार
चंदा सतिश पवार

ग्रामपंचायत कर्डेलवाडी

लता गणेश कर्डीले (लोकनियुक्त सरपंच)

विजयी उमेदवार
किशोर कारभारी कर्डीले
संगिता तुकाराम दसगुडे
नंदा संतोष ढेरंगे
किरण तबा कऱ्हे
उज्ज्वला भीमराज कऱ्हे
रविंद्र रुपचंद फरगडे
अनिल तुकाराम दसगुडे
अनिता गणेश दसगुडे

ग्रामपंचायत सरदवाडी

लक्ष्मी बाळासाहेब जाधव (लोकनियुक्त सरपंच)

विजयी उमेदवार
उमेश आबासाहेब सरोदे
सोमनाथ नानाभाउ सरोदे
मोनाली रवींद्र कर्डिले
गणेश कारभारी सरोदे
शिल्पा अनिल घावटे
विद्या दिपक सरोदे
कृषणा श्रीकांत घावटे
सुरेखा चंद्रकांत निरवणे
आशा सुभाष घावटे

शिरुर ग्रामीण

रामलिंग ग्रामपंचायत मध्ये ८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने सरपंचपदाकरीता एकास एक लढत झाली. सरपंचपद अनूसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनिता राजेंद्र गवारे आणि शिल्पा दिलिप गायकवाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत शिल्पा दिलिप गायकवाड या 2446 मते मिळवत विजयी झाल्या. शिल्पा गायकवाड या माजी नगरसेवक संदिप गायकवाड यांच्या पुतणी आहेत.

शिरुर ग्रामीण विजयी उमेदवार

गणेश दसगुडे
मंदा दसगुडे
स्वाती बो-हाडे
बाबाजी वर्पे
संजय शिंदे
शंकर गायकवाड
मोनिका जाधव

तर यापूर्वीचं खालील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

लत्ता चंद्रकांत इसवे
यशोदा शिवाजी दसगुडे
लिला नामदेव दौंडकर
यशवंत देवराम कर्डिले
छाया काळूराम जाधव
स्वाती विठ्ठल घावटे
सचिन भाउसाहेब घावटे
सोनाली विजय घावटे
यांची रामलिंगच्या ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.

आण्णापूर ग्रामपंचायत

दिपिका राहूल शिंदे (लोकनियुक्त सरपंच)

विजयी उमेदवार

शुभांगी विठ्ठल पवार
शंकर आनंदा रासकर
केशव अनिल शिंदे
रेखा बाळू घावटे
सविता बापूसाहेब कुरुंद्ळे
कांचन गणेश घावटे
मनिषा संतोष शिंदे
वैष्णव आनंदा इसवे
अंबादास दगडू कुरुंदळे
चिमा दिनकर माने .
भाउसो बबन पवार

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणा-या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी मंगलमुर्ती ग्रामविकास पॅनेलच्या सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे विजयी झाल्या.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…

यमुना भागचंद्र खेडकर
वर्षा धनंजय खेडकर
श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर
नम्रता संदिप शिंदे
शोभा रमेश शेळके

मनिषा गणेश पाचुंदकर

नीलेश भाउसाहेब लांडे

अशोक कांतीलाल शेळके
लताबाई दिनेश लांडे
नेताजी संभाजी फंड
अनिल बाळासाहेब दुंडे
रुपाली शरद फंड
हर्षल विलास गदादे
शितल पंचमुख

विरोधी पॅनलचे उमेदवार
राहुल अनिल पवार
अर्चना बापू शिंदे

अपक्ष
आत्माराम भिका खेडकर

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…