शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप (ता. शिरुर) चौफुला येथील रस्ता दुभाजक धोकादायक झालेला असल्याने वाहन चालकांना वाहनाचा अंदाज येत नसल्याने वाहने दुभाजकावर जात असून अनेक अपघात होऊ लागल्याने येथील धोकादायक दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.
शिक्रापूर चाकण रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला रस्त्यावर चौफुला येथे रस्ता दुभाजक बनविण्यात आलेला आहे. मात्र येथील दुभाजक मुळे चाकण व शिक्रापुर रस्त्याने रात्रीच्या सुमारास येणाऱ्या वाहनांना दुभाजकचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमीत सुरु असणारा सिग्नल बसवण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्या सविता बगाटे, शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, माजी सदस्य भगवान शेळके यांसह येथील नागरिकांनी केली आहे. यापूर्वी सदर रस्ता वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर होता. मात्र सध्या शासकीय स्तरावर याची देखभाल करण्यात येत आहे. सदर ठिकाणी वारंवार होत असलेले अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन येथे ठिकाणी सिग्नल बसवावा, अशी मागणी होत असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…