शिरूर तालुका

आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला

स्वराज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश २१६ कोटी अनुदान उपलब्ध

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ३२४ कोटी रुपयांपैकी डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ महिन्यातील वेतनासाठी २१६ कोटी रुपये इतके वेतन अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले असल्यामुळे आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे.

आश्रम शाळांच्या वेतनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने स्वराज्य शिक्षक संघटनेने वेतन अनुदान उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांमधील चालू कालावधीत वेतन अनुदान तरतुद संपल्याने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वेतन अनुदानाची पुरक मागणी फाईल मंजूर केले असून वित्त विभागाकडून वेतन अनुदान पुरवणी फाईल मंजूर होऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास उपलब्ध होताच वेतन अनुदान सर्व जिल्ह्यांमध्ये तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने आता वेतन अनुदान उपलब्ध झाल्याने आता आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वेतन अनुदान उपलब्ध करुन दिल्याने स्वराज्य शिक्षक संघाचे समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहे.

याबाबत बोलताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव कैलास साळुंखे यांनी आश्रमशाळामधील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांचे कामकाज कर्मचारी हिताचे आहे. त्यामुळे उपसचिव बहुजन कल्याण विभाग यांचे स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेकडून आभार मानतो तसेच करोना काळात सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने राज्यातील आश्रमशाळा कर्मचारी यांना न्याय देऊन वेळेवर वेतन करण्याचा प्रयत्न केलेला असल्याचे स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष संदीप गोसावी यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

15 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago