तोतयाकडे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे देखील ओळखपत्र
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन फिरणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून चंद्रमणी शशिकांत शेवाळे, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील वाजे गुळाचा चहा येथे आज १९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक पोलीस अधिकारी असून तो संशयित पणे वावरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, होमगार्ड सुहास डांगे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता हुबेहूब पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश व पेहराव धारण केलेला पोलीस अधिकारी दिसून आले.
त्यामुळे पोलिसांनी सदर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असताना त्याच्याजवळ महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे सहाय्यक सचिव या पदाचे ओळखपत्र मिळून आले. मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने तो तोतया पोलीस अधिकारी असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस हवालदार शंकर नारायण साळुंके रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी चंद्रमणी शशिकांत शेवाळे (वय १९) रा. मेरी मसकड राजवाडा वक्रतुंड नगर नाशिक मूळ रा. जांबूटके ता. दिंडोरी जि. नाशिक याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार व पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
वय व उंची कमी मग गणवेश आणि ओळखपत्र आले कोठून
शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे (वय १९), उंची देखील कमी मग त्याच्याकडे शासकीय गणवेश व ओळखपत्र आले कोठून असा सवाल आता उपस्थित केला जात असून सदर प्रकारामुळे पोलीस देखील चक्रा वून गेले आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…
पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…
जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…
मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…
‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…
कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…