पिंपळसुटी परिसरात भरधाव पिकअप पलटी झाल्याने पिता-पुत्रासह तिघे जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील गुरांच्या बाजाराकडे म्हैस विक्रीसाठी जात असताना पिंपळसुटी (ता.शिरुर) चालकाचा ताबा सुटल्याने महिंद्रा पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात न्हावरा येथील पिता-पुत्रासह तिघेजण जखमी झाले असून, पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना शनिवार दि २७ जून २०२६ रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास पिंपळसुटी गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी आबू संभाजी पवार (वय ४८, रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमीन अबूभाई शेख (रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.a

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आबू पवार हे त्यांचा भाऊ छबू पवार आणि मुलगा निलेश आबू पवार यांच्यासह म्हैस विक्रीसाठी काष्टी(ता.श्रीगोंदा) येथील गुरांच्या बाजारात जात होते. प्रवासासाठी महिंद्रा कंपनीची एम एच १२ डीटी ११३८ क्रमांकाची पिकअप गाडी घेण्यात आली होती.

पिंपळसुटी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाने पिकअप भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन चालविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. अपघातानंतर गाडी जागेवर फिरुन पुन्हा न्हावरा गावाच्या दिशेला झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या अपघातात फिर्यादी आबू पवार यांच्या डोक्याला, डाव्या गुडघ्याला, मणक्याला आणि डाव्या छातीला दुखापत झाली. त्यांचा भाऊ छबू पवार यांना मुका मार लागला. तर मुलगा निलेश पवार याच्या तोंडाच्या उजव्या बाजूला दुखापत होऊन तोंडातील एक दात पडला. तसेच त्याच्या दोन्ही हातांना, छातीच्या उजव्या बाजूला, डाव्या गुडघ्याला आणि कमरेच्या डाव्या बाजूला किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या अपघातात पिकअप गाडीचेही नुकसान झाले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन तिघांच्या दुखापतीसह वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आबू पवार यांनी केली आहे.हि घटना दि २७ जून २०२६ रोजी घडली असून, याबाबत दि १० जुलै २०२६ रोजी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार संपत खाबाले हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

5 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago