शिरूर (तेजस फडके) : विवाहानंतर अवघ्या एक महिन्यापासून पती, सासु आणि दिराने वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका विवाहित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पतीसह सासू आणि दिराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
विद्या महेश चव्हाण (वय ३६) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. त्या मूळच्या शिरूर तालुक्यातील तांदळी येथील असुन, त्यांचा विवाह १८ सप्टेंबर २०२० रोजी महेश श्रीकांत चव्हाण यांच्याशी झाला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाह झाल्यानंतर सुरुवातीचा सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर त्यांचा छळ सुरु झाला. जानेवारी २०२५ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असताना पती महेश श्रीकांत चव्हाण, सासू रंजना श्रीकांत चव्हाण आणि दिर दिगंबर श्रीकांत चव्हाण यांनी वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पतीसोबत बदलापूर पश्चिमेकडील कैलासनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे वास्तव्यास असताना हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. आरोपींनी वारंवार दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सततच्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे आपले वैवाहिक जीवन असह्य झाल्याचे विवाहितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे. याबाबत ९ जुलै २०२६ रोजी शिरूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
शिरूर! आमची पाइपलाइन तोडू नका असे सांगताच लाथाबुक्क्यांनी मारहाण…
शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…
शिरूर बसस्थानकात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास
शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!
शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…
शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…