शिरूर तालुका

कोंढापुरीत दुभाजकाला धडकून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून महेश भास्कर हरीचंद्रे असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन महेश हरीचंद्रे हा त्याच्या ताब्यातील एम एच १७ बी टी ३२१३ या दुचाकीहून भरधाव वेगाने पुणे दिशेने येत असताना समोरील वाहनाला ओहरटेक करुन पुढे जात असताना महेशची दुचाकी दुभाजकावर आदळून महेश रस्त्यावर पडला. दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने महेश भास्कर हरीचंद्रे (वय २०) रा. वाबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत गोरक्षनाथ रक्माजी मोरे (वय ३८) रा. वाबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago