शिरुर (तेजस फडके): न्हावरे- आंबळे रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली सावलीला उभी केलेली गाडी चोरीला गेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरुन नेल्याची तक्रार महेश मारुती पवार (वय 23) रा. बेलवंडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 19) रोजी दुपारी 4:30 च्या दरम्यान फिर्यादी महेश यांनी न्हावरे आंबळे रस्त्याच्या कडेला स्वतःची दुचाकी सावलीला उभी केली होती. काही वेळाने सायंकाळी 6:30 च्या सुमारास महेश हे तिथे गेले असता त्यांना गाडी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेत दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस नाईक ए एस शिंदे हे करत आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…