शिरूर तालुका

त्या बड्या आधिकाऱ्याच्या दबावामुळे एका गुन्हयाचा तपास दोन पोलिस अधिकाऱ्यांकडून बदलला

शेतातून रस्ता न दिल्याच्या कारणावरून दहा जणांकडून तरुणास मारहाण प्रकरण..

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतातून विहिरीकडे जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या कारणावरून सविंदणे (ता.शिरूर) येथे दहा जणांनी मिळून एका तरुणास लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता.२९ मार्च) घडली होती. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.परंतू या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरु असून तब्बल दोन आधिकाऱ्यांकडून तपास काढून घेतला आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात वर्धा येथिल एका बडा उच्च पदस्थ पोलिस अधिकारी शिरूरच्या पोलिस उपविभागीय आधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून कलमवाढ न करण्यास दबाव आणत आहे. अशी चर्चा होत आहे. या आधिकाऱ्याची तक्रार फिर्यादी यांनी गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.

गणेश रामदास पोखरकर (वय-२७, रा. सविंदणे, ता. शिरूर जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी विठ्ठल गेणुजी ढगे, निवृत्ती गेणुजी ढगे, ज्ञानेश्वर गेणुजी ढगे, सनी मारूती ढगे, रवी मारूती ढगे, अमोल मारूती ढगे ( सर्व रा.मांदळेवाडी ता.आंबेगाव जि.पुणे) व अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पोखरकर हे सविंदणे येथे कुटुंबियांसोबत राहण्यास असून वडगाव पीर येथील भैरवनाथ स्टोन क्रशरवर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर येणार असल्याने ते शनिवारी (ता.२९) शेतात गेले होते. त्यावेळी दोन चारचाकी गाड्यांमधून दहा जण घटनास्थळी आले आणि “तु आम्हाला आमच्या विहिरीवर जाण्यासाठी तुझ्या शेतातून रस्ता का दिला नाही” असे म्हणत विठ्ठल ढगे यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पोखरकर खाली पडताच इतरांनीही हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये त्यांची सोन्याची साखळी ही गहाळ झाली. यावेळी अमोल ढगे व सनी ढगे हे गाडीतून तलवार घेऊन आले. मात्र, सत्यवान पोखरकर व दत्तात्रेय रोडे हे मदतीस धावून आल्याने सर्वजण चारचाकी गाडीतून निघून गेले. असे पोखरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

यापुर्वी विठ्ठल ढगे यांनी २४ फेब्रुवारी रोजी शिरूर पोलिस ठाणे येथे गणेश पोखरकर व इतर दोन जणांवर विहीरीवरील मोटार व साहीत्याची मोडतोड केल्याची फिर्याद दाखल केली होतीं . त्यामुळे दोनही गटात वाद शिगेला गेला आहे. ढगे कुटुंबिय वरीष्ठ पोलिस आधिकाऱ्यांच्या ओळखीचा फायदा घेत शिरूर पोलिसांवर दबाव आणत असल्याची तक्रार पोखरकर यांनी केली आहे. आता शिरूर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी दबाव झुगारून काम करणार का?हे पाहणे महत्वाचे ठरेल

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

6 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

12 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

12 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

13 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

13 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

14 तास ago