शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात एका जमीन व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून एका व्यक्तीवर पिस्तुल रोखून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिपक संपत नवले (रा. करडे, ता. शिरूर) या इसमाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश दत्तात्रय रोडे (वय ४१, रा. करडे, व्यवसाय शेती व प्लॉटिंग) यांच्या मते, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या राहत्या घरासमोर उभे असताना आरोपी दिपक नवले याने ५०,००० रुपयांच्या व्यवहारावरून वाद घालत थेट पिस्तुल घेऊन त्यांच्या दिशेने धाव घेतली.
थांब, तुला गोळ्या घालतो, मारूनच टाकतो. तू पैशासाठी खूप दिवस थांबवलंस!” असे धमकीचे शब्द उच्चारून त्याने हातातील पिस्तुल त्यांच्या छातीवर धरले व ट्रिगर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने महेश रोडे यांनी प्रसंगावधान राखून त्याचा हात बाजूला ढकलला व मोठा अनर्थ टळला.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 109, 351(2)(3), पोलीस अधिनियम कलम 135, तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
गेल्या काळात आरोपी दिपक नवले याच्यावर गुन्हा रं. 386/2020, भा.दं.वि. 326, 324 अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई (चॅप्टर केस क्र. 386/2020) करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत परिसरात नवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेची उपाययोजना केली आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…