सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळीहाजी (ता. शिरुर) येथे शिरुर – नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर सोमवार (दि. १२) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. त्याचवेळी संतोष पानगे यांनी गस्तीवरील पोलिसांना तात्काळ बोलावून अर्धा तासात JCB च्या सहाय्याने ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला व पुढील अनर्थ टळला.
रात्रीच्या वेळी या रस्त्याने पुणे मार्केटला जाणाऱ्या तसेच इतरही बाजारासाठी कृषी माल घेवून जाणाऱ्या मालवाहू गाड्या, या परिसरातील MIDC मध्ये काम करणारे कामगार यांची ये जा चालू असते. ज्या ठिकाणी झाड पडले होते तिथे उतारावरुन वाहने वेगाने येत होती त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. एक दुचाकीवरुन जाणारा युवक त्या ठिकाणी थोडक्यात बचावला. हे टाकळी हाजी येथील संतोष पानगे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कल्पना दिली.
गस्तीवर असलेले पोलीस नाईक धनंजय थेऊरकर यांनी सतर्कता दाखवत त्या ठिकाणी दाखल झाले. संतोष पानगे हे स्वतः त्या ठिकाणी JCB घेवून आले. व पोलिसांच्या मदतीने रात्री 12: 30 वाजता त्यांनी रस्ता मोकळा केला. रात्रीच्या वेळी दुर्घटना होवू शकते हे लक्षात येताच संतोष पानगे व गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ रस्ता खुला केल्याने व पुढील अनर्थ टळल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…