छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाचा विकास होत असताना सदर विकास आराखड्याबाबत स्मृती समिती व ग्रामस्थांना विचार घेतले जात असून यामध्ये ग्रामस्थांना व समितीला विचारात घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ येथे गेली २६ वर्षांपासून समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार साठी सेवा करत आहेत, मात्र सध्या समाधी स्थळाचा विकास होत असताना येथे होणाऱ्या विकास आराखड्याबाबत समितीला विचारात घेतले नाही त्यामुळे सदर ठिकाणी विकास आराखडा तयार करताना समितीला विचारात घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, नंदकुमार एकबोटे, शांताराम भंडारे, अनिल भंडारे, संजय भंडारे, हरिभाऊ भंडारे, सचिन भंडारे, लक्ष्मण भंडारे यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक हे विशेषण न वापरता धर्मवीर हेच विशेषण वापरावे, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…