मुख्य बातम्या

जिरायत-पाबळच्या विकासासाठी एमआयडीसीची हाक; शेतकरी-नागरिक एकवटले

मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंतांची भेट घेऊन निवेदन देणार

पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पश्चिम भागाच्या विकासासाठी जिरायत-पाबळ परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी धामारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. एमआयडीसीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या भागात मोठ्या प्रमाणावर पडीक आणि डोंगराळ जमीन उपलब्ध आहे. या जमिनीचा औद्योगिक विकासासाठी वापर झाल्यास परिसराच्या विकासाला चालना मिळू शकते. एमआयडीसीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल, अशी भूमिका समर्थक शेतकरी व नागरिकांनी मांडली.

जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी

एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच १५ टक्के विकसित जमीन परतावा, शेतकरी कुटुंबांचे योग्य पुनर्वसन आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच एमआयडीसीची प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.

धामारीचे माजी सरपंच संपत कापरे म्हणाले, “या भागात मोठ्या प्रमाणावर पडीक व डोंगराळ जमीन आहे. सरकारने ही जमीन घेऊन एमआयडीसी उभारावी.”केंदूरचे माजी सरपंच अविनाश साकोरे यांनी, “शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच एमआयडीसी करावी,” अशी मागणी केली.संदीप साकोरे यांनी योग्य मोबदला, १५ टक्के विकसित जमीन परतावा आणि शेतकरी समाजाच्या पुनर्वसनासह एमआयडीसीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन चौधरी, शिवसेना नेते प्रकाश चौधरी, के. के. चौधरी, दीपक चौधरी, नवनाथ चौधरी, अजय चौधरी, सचिन डफळ, राज गायकवाड, संदेश चौधरी, धामारीचे माजी उपसरपंच अर्जुन भगत, अविनाश साकोरे, नानाभाऊ साकोरे, विशाल थिटे, धनंजय थिटे, गणेश थिटे, पाबळचे महादेव करपे, कान्हूर मेसाईचे चेअरमन भास्कर पुंडे, रामा कुलट, संतोष पुंडे यांच्यासह कान्हूर मेसाई व पाबळ परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 मिनिटे ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

18 मिनिटे ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 मिनिटे ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

24 मिनिटे ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

26 मिनिटे ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

2 तास ago