शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील डोंगरगण येथे वाळूमाफीयांनी वाळू उपसा करून वाळू वाहतुक करताना एका शेतकऱ्याने त्यांचा रस्ता अडवल्याने त्याला जबर मारहाण करूण गंभीर जखमी केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला असुन असा गंभीर प्रकार घडत असताना तेथील मंडल आधिकारी, तलाठी हे काय करत होते…? असा प्रश्न उपस्थित होत असुन गेल्या अनेक वर्षापासून डोंगरगण, टाकळी हाजी, शिनगरवाडी येथे वाळू तसेच मुरुमाचा बेसुमार ऊपसा होत असून मंडल आधिकाऱ्याच्या आशिर्वादाने हे सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे.
या जबाबदार आधिकाऱ्याची तात्काळ चौकशी होऊन बदली करुन दुसऱ्या मंडल आधिकारी आणि तलाठ्यामार्फत सदर ठिकाणच्या ऊत्खननाचे पंचनामे होणे गरजेचे आहे. नुकतेच काही महिन्यांपुर्वी महसुलमंत्री यांनी ज्या सजाच्या ठिकाणी वाळूचे बेकायेदशीर उत्खनन होताना आढळत्यास तात्काळ त्या सजातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे फर्मान सोडले होते. त्याची आता महसूल विभाग अमंलबजावणी करणार का…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मंडल आधिकाऱ्याने नोंदीसाठी अनेक जणांना विनाकारण त्रास दिल्याची चर्चा बेट भागात रंगली असून अनेक जणांनी नाव न छापणाच्या अटीवर आम्हाला कसे लुटले याची हकीगत फोनवरून तसेच प्रत्यक्षात ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधींना सांगितली आहे. अशा गब्बर झालेल्या स्थानिक मंडल आधिकाऱ्याच्या विरोधात जनतेचा रोष प्रंचड वाढला असून त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे…( क्रमश )
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…