मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC त चार जणांकडुन एकास बेदम मारहाण

शिरुर (तेजस फडके) ‘आमच्या भावाच्या विरोधात तु कंपनीतील महिलांना खोट्या तक्रारी का करायला लावतो’ असे म्हणत चार जणांनी रांजणगाव MIDC त एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सुरेश मारुती ननवरे यांनी याबाबत फिर्याद दाखल केल्याने 1) राजेंद्र पांडुरंग निचीत 2) संदीप शिवाजी निचीत 3) स्वाती विजय निचीत 4) विजय पांडुरंग निचित सर्व (रा. पेरणे, ता. हवेली जि.पुणे) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि 22) रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास रांजणगाव MIDC मधील कारेगावच्या हद्दीतील याझाकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मेन गेट समोर वरील चारही आरोपी फिर्यादीस ,” तू आमचा भाऊ विजय निचीत याच्याविरुद्ध कंपनीतील महिलांना खोट्या तक्रारी देण्यास का लावतो असे म्हणत संदीप शिवाजी निचित याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या ,डोक्यात, कंबरेवर उजव्या पाय ,उजव्या हातावर मारले, राजेंद्र निचीत याने फिर्यादीस हाताने मारहाण करून विजय निचीत व स्वाती निचीत यांनी शिवीगाळ दमदाटी केली आहे.

त्यामध्ये फिर्यादीच्या डोक्यात डाव्या कानाच्यावर गंभीर जखम झाली असून कमरेवर उजव्या पायावर, उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली असल्याने सुरेश मारुती ननवरे (वय 44 )( रा. बी 501 जे डी शुभारंभ वाघोली, ता.हवेली जि.पुणे) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले असुन रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago