शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…

शिक्रापूरः विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी या विद्यालयामध्ये इयत्ता १०वीच्या सन २००१-०२ या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्नेह मेळाव्यास विद्यालयाचे माजी प्राचार्य बाजीराव पडवळ सर, बाजीराव पुंडे सर, पवार डी. ए.सर, अर्जुन चव्हाण सर, विष्णू मुंजाळे सर अभिनव विद्यालय सरदवाडी चे मुख्याध्यापक अरुण गोरडे सर, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगीचे प्राचार्य संजीव मांढरे सर तसेच रमेश जाधव सर हे सर्व उपस्थित होते.

स्नेह मेळाव्यात विद्यालयातील 65 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. या मेळाव्यामध्ये सुरेखा दौंडकर, स्वप्निल खेडे, सुभाष वडघुले, चंद्रकांत इंगळे, बापू दौंडकर , अश्विनी पडवळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगतादरम्यान शाळेविषयी आपल्या मनातील आदर भावना व्यक्त केल्या. या स्नेह मेळाव्यात उपस्थित सर्व गुरुजनांनी आपले अनमोल असे विचार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्याचे सुत्रसंचालन दत्ता लांडगे, रूपाली वडघुले यांनी केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन चंद्रकांत इंगळे यांनी केले. स्नेह मेळाव्याचे आयोजन शिल्पा करपे, सुभाष वडघुले, सर्व मित्र-मैत्रिणींनी केले होते.

दरम्यान, स्नेह मेळाव्याच्या शेवटी आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी स्वप्निल खेडे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थ्यांकडून आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विद्यालयास रुपये ३०००० किमतीचे दोन लॅपटॉप देण्याचे ठरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

16 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago