शिरूर तालुका

शिक्रापूर चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर चाकण रस्त्यावर हॉटेल ग्रीन पॉइंट हॉटेल समोर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एका तेजस कुंडलिक भोगाडे या युवकाचा मृत्यू तर करण उर्फ अनिल डोईफोडे हा युवक गंभीर जखमी झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने तेजस भोगाडे व करण उर्फ अनिल डोईफोडे हे दोघेजन रात्रीच्या सुमारास चाकण बाजूने शिक्रापूर बाजूकडे येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची या युवकांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली दरम्यान दोघे रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाले. यावेळी दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनाचे चाक तेजसच्या अंगावर गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान दोघांना शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तेजस तेजस कुंडलिक भोगाडे (वय २९) रा. दत्तप्रसाद कॉलनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. खरपुडी बुद्रुक ता. खेड जि. पुणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर करण उर्फ अनिल डोईफोडे रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत रवींद्र पांडुरंग भोगाडे (वय ३३) रा. खरपुडी बुद्रुक ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

20 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

20 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

20 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

20 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

20 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

1 दिवस ago