शिरूर तालुका

युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गोपाळ वस्ती येथील युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करून २५ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. सन २००० मध्ये पैलवान नारायण पवार, राजेंद्र नाना पवार व कै. शिवाजीराव गव्हाणे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले हे मंडळ आज सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात एक आदर्श ठरले आहे.

मंडळाचा अष्टविनायक राजा गणपती वर्षभर दर्शनासाठी उपलब्ध असून शिरूर, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील भाविकांसाठी नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. या गणपतीचे आसन अष्टविनायकांनी सुशोभित असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाने तामिळनाडूतील लक्ष्मीनारायण सुवर्ण मंदिर, वेल्लोर याची प्रतिकृती साकारून भव्य देखावा उभारला आहे. भक्तांसाठी हा एक दिव्य व अद्वितीय अनुभव ठरतो आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून मंडळाने रक्तदान व आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, क्रीडा स्पर्धा, तालीम परंपरेचा प्रचार, स्वच्छता अभियान आणि संदेशमूल्यपूर्ण हलते देखावे या उपक्रमांतून समाजाशी नाते घट्ट केले आहे. विद्यमान अध्यक्ष निलेश दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रौप्यमहोत्सवी पर्व उत्साहात पार पडत असून प्रकाशशेठ धारीवाल यांसह विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मंडळाला सतत लाभत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago