Categories: इतर

मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून ऑलिंपिक विजेते घडावेत; अजित पवार

पुणे: महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या बैठकीत व्यक्त केली.

महाराष्ट्रात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांची मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनीही मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिंपिकमधील पहिले पदक मिळवून दिले. त्यांचा वारसदार घडवण्याची जबाबदारी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांची आहे. प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेने क्रीडा प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हरियाणा, पंजाब, ओडिशा इत्यादी राज्यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा नावलौकिक उंचावला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या राज्यातील क्रीडा संघटने खेळाडूंच्या विकासावर अधिकाधिक भर दिला पाहिजे.

शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळेल याची मी ग्वाही देतो. मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत नैपुण्यशोध आणि विकास यावर भर दिला पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, तालुका आणि क्रीडा स्तरावरील असलेल्या विविध क्रीडा संकुलांचा खेळाडूंना अधिकाधिक कसा फायदा होईल या दृष्टीने प्रत्येक खेळाच्या संघटनेने जबाबदारी उचलली पाहिजे.

शिरगावकर यांनी सांगितले, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनने आगामी 8 वर्षांच्या विविध क्रीडाविषयक योजनांचे नियोजन केले आहे. इसवी सन २०२८ व २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकावीत या दृष्टीनेच आम्ही नैपुण्यशोध व विकास या अनुषंगाने काही योजना आखल्या आहेत.

आगामी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही त्या दृष्टीनेच पायाभरणी असणार आहे. या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यांमधून नऊ हजार खेळाडू व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेला भावी ऑलिंपिकपटूंचा शोध घेणे सोपे होणार आहे. ही स्पर्धा दिमाखदार आणि संस्मरणीय व्हावी या दृष्टीनेच आमचे प्रयत्न राहतील. या स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योतीचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात या ज्योतीचा प्रवास असेल. त्यामुळे राज्यात क्रीडाविषयक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दिवसे यांनी सांगितले, खेळाडू हाच केंद्रबिंदू मानून राज्याचे क्रीडा संचालनालय काम करीत राहणार आहे. आगामी 3 वर्षांच्या क्रीडा स्पर्धा आणि त्या अनुषंगाने आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम याचा आराखडा आम्ही लवकरच निश्चित करणार आहोत.‌ प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेकडून प्रत्येक खेळाडू व प्रशिक्षक यांची सविस्तर माहिती आम्ही संकलित करणार आहोत. त्यामुळे खेळाडूची पार्श्वभूमी, त्याला आलेल्या अडीअडचणी इत्यादींचा अभ्यास आम्हाला करणे सोपे पडणार आहे. त्याचा फायदा त्याला विविध सुविधा देण्यासाठी निश्चितच होणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिल्यामुळे आता लवकरच या स्पर्धेचे कार्यक्रमपत्रिकाही निश्चित केली जाईल.

या बैठकीस महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे संलग्न क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. असोसिएशनचे खजिनदार धनंजय भोसले यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे. उपाध्यक्ष संजय शेटे, निलेश जगताप, राजाराम राऊत, सहसचिव प्रकाश तुळपुळे व सुंदर अय्यर, तसेच अमित गायकवाड, पूर्णपत्रे, सोपान कटके, स्मिता यादव इत्यादी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago