इतर

कपलसोबत अज्ञाताच अजब कृत्य, तरुणाच बोट ठेचून तरुणीच्या भांगात भरन रक्त अन…

पाटणा: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे.

हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी दोघांचेही औपचारिक आणि कायदेशीर पद्धतीने लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेरमध्ये सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अज्ञात लोक एका जोडप्याचं जबरदस्तीनं लग्न लावताना दिसत आहेत.

खरगपूर तलावाला भेट देण्यासाठी एक जोडपं आलं होतं. लोकांनी यातील तरुणाचं लोकांनी बोट कापलं, त्यानंतर हे रक्त तरुणीच्या डोक्यात लावण्यास सांगितलं. तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पाहून कुटुंबीयांनी बदनामीपासून वाचण्यासाठी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली असता, हा व्हिडिओ हवेली खडगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खडगपूर तलावाजवळील असल्याचे समोर आले. हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. हा व्हिडिओ 21 ऑगस्टचा आहे. तरुण आणि तरुणी खरगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी गेले होते.

दोघांचं दोन महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाचं नाव मिथलेश कुमार असं आहे. मिथलेश हा बरियारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहादूरपूर येथील रहिवासी महेश प्रसाद गुप्ता यांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी प्रेमी युगुल तलावावर गेले होते. तिथे अज्ञात युवकांनी मुलीला आणि तरुणाला एका झुडपाजवळ बसवून त्यांची विचारपूस सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपींने खोटे आरोप करत आधी मुलाचे बोट दगडाने ठेचले आणि नंतर मुलीच्या भांगात कुंकू भरलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

7 तास ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

7 तास ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

1 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

1 दिवस ago

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर (तेजस फडके) पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार (Pune Porsche car accident)…

2 दिवस ago