क्राईम

पुण्यातील धक्कादायला घटना, वेबसिरीज पाहून रचला हत्येचा कट…

पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

खराडी येथे कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. अक्षय प्रकाश भिसे (वय 26) रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनाचा उलगडा झाला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. संतोष सत्यवान शिंदे (वय 28) बिदर, कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर आणि संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने केली.

वेब सीरिज पाहून हत्येचा कट

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी आधी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिल्या होत्या. ते पाहूनच त्यांनी अक्षयच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश येथून पिस्तूलही खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा कसुन तपास करत आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले 

अक्षय भिसे या खराडी येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा 21 ऑगस्टला खून करण्यात आला होता. सकाळच्या सुमारास तो कचरा वेचण्यासाठी गेला असता दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला. याच प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडूनही सुरू होता. 21 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरुआहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

6 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago