क्राईम

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मगरपट्ट्यात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू

हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून साडेचार वर्षांच्या अनिका नवनाथ देवीकर हिचा मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

अनिका खेळत असताना अचानक घसरगुंडी कोसळून तिच्या डोक्याला, चेहऱ्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोसायटीतील घसरगुंडी व्यवस्थित बसवलेली नव्हती आणि ती काढून टाकण्याबाबत वारंवार सूचना देऊनही पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे सोसायटी अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साने पुढील तपास करत आहेत.

मद्यधुंद कारचालकाची धडक; दोन ठार, दोघे गंभीर

दरम्यान, सासवड परिसरात मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रविंद्र काकडे (वय ६५) आणि महेंद्र काकडे (वय ५३, दोघेही रा. पांगारे, ता. पुरंदर) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसऱ्या दुचाकीवरील तुकाराम पोमण (वय ६०) आणि त्यांची पत्नी सुरेखा पोमण (वय ५०, रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी कारचालक अक्षय परख (वय ३०, रा. हडपसर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काकडे यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

14 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

18 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

18 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

18 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

18 तास ago

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…

19 तास ago