महाराष्ट्र

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान सर्व ५०० चौ.फुटांपर्यंतच्या मिळकतींना करसवलतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सत्ता आल्यानंतर ही घोषणा बदलत केवळ महिलांच्या नावावर असलेल्या मिळकतींनाच सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पात याची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता.

गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. शहरात महिलांच्या नावावर नोंद असलेल्या ५०० चौ.फुटांपर्यंतच्या मिळकतींची संख्या ७०,७७३ इतकी आहे. या मिळकतींमधून महापालिकेला सुमारे ४०.४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रस्तावित सवलतीमुळे अंदाजे २० कोटी रुपयांचे उत्पन्न घटण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, मिळकतकर बिलांच्या छपाईसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी महापालिकेने खासगी बँकेमार्फत बिले मोफत छापण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत बँकेचा लोगो बिलावर छापण्यात येणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, “महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली असून पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.”

अटी व शर्ती :

३१ मार्च २०२५ पर्यंत महिलांच्या नावावर नोंद असलेली मिळकतच पात्र

सवलत फक्त २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू

१ एप्रिल २०२६ पूर्वीची थकबाकी, व्याज, दंड यावर सवलत नाही

आधीपासून ४०% सवलत असलेल्या मिळकतींना २५% सवलत लागू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago