महाराष्ट्र

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांसाठी २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या सदनिकांचे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत आहेत. यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीनंतर मागणीअभावी रिक्त राहिलेल्या सदनिकांची ही विक्री प्रक्रिया आहे.

विकासकांकडून प्राप्त अहवालानुसार, पारदर्शकतेच्या दृष्टीने ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र अर्जदारांना प्राधान्याने सदनिका दिल्या जाणार आहेत. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

दरम्यान, सोडतीनंतरही विक्रीअभावी शिल्लक राहणाऱ्या सदनिका पुढील काळात उपलब्ध होताच त्यांची पडताळणी करून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावरच वाटप करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago