पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या 6 महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिल. अतिशय वेदनादायक ही घटना आहे.
संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतक बालकाची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. आपल्या बालकाला रुग्णालयात घेवून जाण्याचा प्रवास हा त्याच्यासोबतचा शेवटचा प्रवास असेल अशी त्यांना कल्पनादेखील नसेल. पण दुर्देवाने अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं.
बालकाला रुग्णालयात घेवून जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने घात केला. खरंतर ती ट्रॅक्टर चालकाची चूक होती का पोलीस तपासाचा भार आहे. मृतक बालकाचे आई-वडील दुचाकीने रस्त्याने जात असताना त्यांनी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरला पुढे जाण्यासाठी जागा दिली. पण इथेच घात झाला. ट्रॅक्टर पुढे निघून गेला. पण त्याची ट्रॉली राहिली होती. ट्रॅक्टर पुढे जात असताना ट्रॉलीचा धक्का बसला आणि आईच्या हातून बाळ खाली पडलं. त्यानंतर ते बाळ थेट ट्रॉलीच्या चाकाच्या खाली चिरडलं गेलं. ही घटना इतकी वेगाने घडली की रस्त्यावरच्या कुणालाच काही समजलं नाही.
बाळाच्या अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली पुढे निघून गेल्यानंतर आईने रडत आपल्या लेकराला उचललं आणि त्याला कवटाळून छातीशी घेतलं. त्याला गोंजारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची दुचाकी खाली पडली होती. रस्त्यावर ये-जा करणारे नागरीक त्यांच्याकडे गेले. त्यांनी दाम्पत्याला बाळासह रस्त्याच्या बाजूला नेल्यावर बाळाला तातडीने रुग्णालयात नेलं पण बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…