शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील महसुल विभागात असलेली खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असुन शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिरुर तालुक्यातील ट्रस्टच्या जागेच्या (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने त्याच्यासाठी व वरिष्ठ अधिकार्यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत हि बाब उघड झाली आहे.
शिरुर येथील तत्कालीन तहसीलदार रंजना उमेश उमरहांडे, शिरुर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक स्वाती सुभाष शिंदे, तलाठी सरफराज तुराब देशमुख, खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अॅन्टी करप्शनच्या पथकाने तलाठी सरफराज देशमुख याला ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एन.ए. प्रस्ताव मंजूर करावयाचा होता. त्यासाठी तलाठी देशमुखने त्यांच्याकडे 42 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी 5 लाख रूपये तर स्वाती शिंदे यांनी 1 लाख रूपयाची मागणी केली. आरोपी घाडगे आणि निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराकडून अॅन्टी करप्शनकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरील तक्रारीची दि. 25 मे 2022 ते दि. 19 नोव्हेंबर 2022 दरम्यान पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वजण लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज (सोमवार) दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी पाचही जणांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरनाथ माने यांनी ही कारवाई केली.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…