प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी
मुंबई: मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.
वडेट्टीवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून मोशी कचरा डेपो परिसरातील बांधकाम परवानग्या, नियमांचे उल्लंघन आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ६५ ते ७० फूट उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर तीन मजली प्रशासकीय इमारतीला परवानगी देण्यात आली. पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार आवश्यक बफर झोन राखणे बंधनकारक असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून धोकादायक परिसरात बांधकाम व वापर परवानग्या देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना व बांधकाम परवानगी विभागातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार मोशी डेपो व वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कचऱ्याचे ढिगारे शास्त्रोक्त पद्धतीने कमी करावेत, आवश्यक बफर झोनची पुनर्स्थापना करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…