महाराष्ट्र

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस, NSUI आणि समविचारी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत NSUI आणि युवक काँग्रेसने ‘जेन झी युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका जाहीर करून राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील अपयशासाठी त्यांना “नापास” घोषित केले.

सागर साळुंखे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप करत शिक्षकांवर बीएलओची अतिरिक्त कामे लादल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगितले. तसेच कॉलेज प्रवेश प्रक्रिया, बोगस नर्सिंग महाविद्यालये, आदिवासी विद्यार्थ्यांची कथित फसवणूक आणि विविध शुल्कांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनीही सरकारवर टीका करत, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होत असताना “थँक्यू मोदी” अभियान कशासाठी, असा सवाल करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत NSUI चे प्रदेश महासचिव ऋषीकेश खंडाळे यांनी शिक्षण विभागातील कथित अनियमिततांवर सादरीकरण केले. दक्षिण मध्य मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा ढवळे याही यावेळी उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago