क्राईम

शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल न दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातीलआंधळगाव येथील सुनिल विलास कुसेकर, भानुदास पोपट नलगे या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जुन महिन्यात तोडून ट्रक्टरमध्ये वाहून नेला आहे. याचे पेमेंट 15 दिवसांच्या आत देतो असा विश्वास देवुन ती रक्कम त्या शेतकऱ्यांना आजरोजी पर्यंत न देता त्यांची आर्थिक फसवणुक केल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल कुसेकर यांचा 58.670 टन उस दोन ट्रॅक्टर मधून नेऊन उसाचे एकूण 139,400 /रु. (एक लाख एकोणचाळीस. हजार चारशे रुपये व भानुदास नलगे यांचा 119 टन उस दोन ट्रॅक्टर मधून नेउन उसाचे एकूण 2,83,800/- (अक्षरी दोन लाख ऐंशी हजार रुपये रक्कम इतकी आर्थिक फसवणुक केल्याने या शेतकऱ्यांनी आरोपी १ ) आशिष शांताराम साठे, रा. नागरगांव, ता. शिरूर, जि. पुणे , २ ) नवनाथ सुभाष झेंडे, रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांच्यावर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल केला आहे. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

4 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago