शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात दोघे मित्र उभे असताना अज्ञात युवकाने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या जवळील पिस्तुल मधून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात रोहन पाठक व अजय चव्हाण हे दोघे उभे रात्रीच्या सुमारास अंधारात उभे असताना एक युवक दुचाकीहून सदर ठिकाणी आला त्याने दोघांच्या डोळ्यावर दुचाकीची लाईट मारून शिवीगाळ, दमदाटी करत अचानक कमरेला लावलेले पिस्तुल काढून रोहनच्या दिशेने पिस्तुल रोखून गोळीबार करत पुन्हा पिस्तुल रोहनच्या डोक्याला लावून निघून जा नाहीतर गोळीच घालीन, अशी धमकी दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, आत्माराम तळोले, मिलिंद देवरे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, जयदीप देवकर, अंकुश चौधरी यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना येथे पिस्तुलची पुंगळी मिळून आली. तर घडलेल्या घटनेबाबत रोहन राकेश पाठक (वय २३) रा. पाटवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…