शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे मूळ गावी मोराची चिंचोली येथे यापुर्वू काही वाद झालेले होते. त्यानंतर 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अतुल धुमाळ व त्याचा मित्र सागर येवले या दोघांनी दत्तात्रय यांना फोन करुन तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून मलठण फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर दतात्रय सदर ठिकाणी आले असता दोघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत तू आणि तुझ्या भावाने मला गावात मारले ना तुला दाखवतोच असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी करुन दुचाकीहून पळून गेले.
याबाबत दत्तात्रय भाऊसाहेब धुमाळ (वय ३९) रा. सायकर मळा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ दोघे रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…