Shikrapur Police Station
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत घरासमोर टाकलेल्या मुरुमामुळे झालेल्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राजपाल माचरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव ढमढेरे रोड लगत राहणाऱ्या रोहित माचरे याने त्याचे घराशेजारी मुरूम आणून टाकला होता, त्यामुळे शेजारील दुर्गाप्रसाद यादव यांच्या दुकानासमोरील पीक अप वाहन निघण्यास अडचण होत होती. त्यामुळे यादव यांनी रोहित यास सदर मुरूम बाजूला हटवण्यास सांगितले त्यावेळी रोहित नेट थोडा मुरुम हटवला व निघून गेला त्यामुळे दुर्गाप्रसाद यादव या सदर ठिकाणचा मुरुम बाजूला करत असताना रोहित माचरे सदर ठिकाणी आला त्याने दुर्गाप्रसाद यांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करत जखमी केले.
घडलेल्या घटनेबाबत दुर्गाप्रसाद पतीराम यादव (वय ३५) रा. करंजेनगर तळेगाव रोड शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रोहित राजपाल माचरे रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…