औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गंगापूर तालुक्यात शेजारीच राहणाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार करत तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलेलाही याबाबत कुठे वाच्च्यता केलीस तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तब्बल 5 दिवसांनी महिलेने तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी रायभान थोरात, राहुल आघाडी, अनिल शिरसाट या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींनी 1 एप्रिलच्याा रात्री दीडच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडितेच्या पतीला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या नंतर जखमी पतीला आरोपींनी थेट 45 फूट खोल विहिरीत टाकले. अर्ध्या तासानंतर त्याला पुन्हा वर काढून जीव जाईपर्यंत आरोपींनी मारहाण केली.
यादरम्यान, आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेला धमकी देत कोणालाही याबद्दल न सांगण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत महिलेने घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…