शिरुर (तेजस फडके): बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका महिलेची डोक्यात वर्णी घाव घालून निघृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. संगीता रमेश आडके (वय 47) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान गावाजवळील भीमा नदीच्या काठी शेळ्या चारण्यासाठी गेलेली होती. अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून सदर महिलेला ठार केले आहे. गावातील पोलीस पाटील मीना रणजीत पाडळे यांनी सदर घटनेची शिरुर पोलिसांकडे खबर दिली. सायंकाळी महिलेने चारायला नेलेल्या शेळ्या घरी आल्या होत्या.
परंतु सदर महिला घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी महिलेची शोधाशोध करायला सुरवात केली. त्यावेळी रात्री उशिरा भीमा नदीकाठी महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ताबडतोब मांडवगण फराटा आऊट पोस्टचे पोलीस दाखल झाले.
त्यानंतर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव,पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली.
सदर महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस तपास सुरु होता. महिलेचा निघृन पद्धतीने खून झाल्याने संतप्त जमाव घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…