महिलेचे बदनामीकारक फोटो बनवून सोसायटी खाली फेकले
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मैत्रिणीकडे आलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून महिलेचा विनयभंग करुन महिलेची बदनामी करण्याच्या हेतूने महिलेचे अश्लील फोटो व मजकूर बनवून महिलेचे फोटो महिला राहत असलेल्या पुणे येथील सोसायटीच्या बाहेर चिटकवत सोसायटीच्या खाली टाकून दिल्याची घटना घडली असल्याने सुर्यकांत चंद्रकांत शिर्के या फोटोग्राफर युवकावर गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एका मैत्रिणीकडे पिडीत महिला आलेली असताना महिलेचा पती फोटोग्राफर असलेला सुर्यकांत शिर्के याने महिलेचे अश्लील स्वरुपातील फोटो काढले त्यांनतर महिलेला फोन करुन तू मला भेट नाहीतर तुझे कपडे बदलतानाचे फोटो मी सोशल मिडीयावर प्रसारित करेल अशी धमकी दिली.
दरम्यान महिला त्याला भेटली त्याने मला तू त्रास देऊ नकोस, असे सांगितले असता त्याने महिलेचा हात पकडत विनयभंग केला मात्र बदनामी नको म्हणून सदर महिलेले घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले नाही. मात्र सुर्यकांत हा वारंवार महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, त्यामुळे महिलेच्या आई, वडिलांसह भावाने सुर्यकांत याला समजावून सांगितले तसेच महिलेने त्याचे मोबाईल नंबर ब्लॉक करुन टाकले.
त्यांनतर सुर्यकांत याने पोस्टर बनवून त्यात महिलेच्या फोटोवर महिलेबाबत अश्लील मजकूर व मोबाईल नंबर टाकून महिला राहत असलेल्या सोसायटीचे खाली टाकत काही दुकानावर चीटकवले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबीयांनी सोसायटी समोरील सीसीटीव्ही फुटेल तपासले असता त्यामध्ये सुर्यकांत शिर्के हा रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी महिलेची बदनामी करणारे पोस्टर चिटकवताना व टाकून देताना दिसून आला.
त्यामुळे पिडीत महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे धाव घेतघडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली असल्याने कोंढवा पोलिसांनी शिक्रापूर येथील फोटोग्राफर सुर्यकांत चंद्रकांत शिर्के रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध विनयभंगासह आदी गुन्हे दाखल केले असून कोंढवा पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग केल्याने सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…