क्राईम

पुणे जिल्ह्यात बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर…

पुणे: राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे (वय 51) आहे. तर पीडित तरुणीचे (वय 19) आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, रविवार (दि.10) रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका करुन तिथून सुटका केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. तसेच घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. अखेर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशकातही पारिचारीकेवर अत्याचार

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे एका खासगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या रूममध्ये प्रवेश केला. तसेच माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगत रुममध्ये प्रवेश केला. यानंतर पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago