महाराष्ट्र

रेल्वे स्टेशनवर कुलीच काम करणारा जेव्हा IAS अधिकारी होतो तेव्हा…

मुंबई: कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की “कोण म्हणतो की यश फक्त नशीब ठरवते, जर तुमची इच्छा शक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. इच्छा शक्तीच्या बळावर अनेकांनी मोठे यश संपादन केलंय. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी श्रीनाथ यांची एर्नाकुलम स्टेशनवर हमालाचं काम करणारा हा व्यक्ती आता IAS अधिकारी आहे. आपल्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आणि IAS अधिकारी बनले.

काही वर्षां पूर्वीपर्यंत कुली म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथने IAS अधिकारी बनून जगापुढे नवा आदर्श ठेवलाय. संकट असली तरी त्याचं संधीत रुपांतर करुन कसं यश मिळवता येईल. हे त्यांनी दाखवून दिलं. अपयशाचे कारण सांगणारे अनेक जण असतात. जर त्यांना सर्व सुख-सुविधा मिळाल्या असत्या तर त्यांना जीवनात नक्कीच यश मिळाले असते, असा त्यांचा विश्वास असतो. मात्र, श्रीनाथ या लोकांपैकी अजिबात नाही. संसाधनं नसताना ही त्याची कधीच तक्रार नव्हती. श्रीनाथ यांनी आपल्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही आपल्या यशाच्या आड येऊ दिली नाही.

आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा विचार त्यांनी नेहमी केला आणि त्यामुळेच ते त्यांच्या आयुष्यात इतके यशस्वी झाले. कोचिंगशिवाय UPSC पास होणे अवघड असते. देशभरातील लाखो लोकं UPSC परीक्षा देतात आणि त्यांचे नशीब आजमावतात. त्यापैकी फक्त काही टक्केच लोकं ही परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून शहरातील मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये लाखो रुपये खर्च करतात. परंतु श्रीनाथ सारखे काही उमेदवार आहेत, ज्यांना UPSC कोचिंगसाठी इतके पैसे देणे परवडत नाही, म्हणून ते स्व-अभ्यासाद्वारे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात.

श्रीनाथ मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे आहेत. एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर ते कुली म्हणून काम करायचे. रेल्वेच्या मोफत वायफायद्वारे ते इंटरनेटचा वापर करायचे. श्रीनाथकडे UPSC च्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंग सेंटरची फी भरण्याइतके पैसे नव्हते. अशा परिस्थितीत कोचिंगशिवाय ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही, असा विचार त्याच्या मनात आला. याच कारणामुळे त्यांनी प्रथम केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. स्टेशनवर बसवण्यात आलेल्या फ्री वाय-फाय वरून त्यांनी स्मार्ट फोनच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला.

श्रीनाथ यांच्यासाठी हे मोफत वाय-फाय वरदानापेक्षा कमी नव्हते. तो येथे कुली म्हणून काम करायचा आणि त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते परीक्षेची तयारी करत असे. खरे समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर श्रीनाथच्या मनात विचार आला की ते रेल्वेच्या मोफत वाय-फायच्या मदतीने आणि खऱ्या समर्पणाने यूपीएससीची परीक्षाही देऊ शकतात. IAS झाल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आणि तीच परीक्षा उत्तीर्णही केली.

कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण करुन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. श्रीनाथ यांनी त्यांच्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही त्यांच्या यशाच्या मध्ये येऊ दिली नाही. संकटातून मार्ग काढला आणि पुढे आएएस अधिकारी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि 'डोह'कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार…

6 मिनिटे ago

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही,…

8 मिनिटे ago

मुंबईतील फूटपाथ नेमके कुणासाठी? फेरीवाल्यांचा हक्क आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत संतुलन कधी साधणार?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, व्यवसाय आणि उपजीविकेसाठी दररोज लाखो नागरिक येतात.…

17 मिनिटे ago

शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या…

3 तास ago

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

5 तास ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

19 तास ago