क्राईम

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींची मुलगी दीप्ती हिचा विवाह रोहन कारभारी याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी त्रास दिला जाऊ लागला.

चारचाकी वाहनासाठी पैशांची मागणी

तक्रारीनुसार, दीप्तीकडे माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी सतत पैशांची मागणी केली जात होती. २५ डिसेंबर २०१९ पासून २४ जानेवारी २०२६ या कालावधीत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दीप्ती पूर्णपणे कोलमडून गेली होती.

जबरदस्तीच्या गर्भपाताचा धक्कादायक आरोप

या प्रकरणात आणखी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली असून, दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दीप्ती गर्भवती असल्याची माहिती समजल्यानंतर सुरुवातीला सर्वांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र नंतर तिला मूल नको असल्याचे सांगत, तिच्यावर दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

राहत्या घरी गळफास

सततच्या छळाला कंटाळून अखेर दीप्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दीप्तीला न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

10 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

18 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago