रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC त ढोकसांगवी गावच्या हद्दीत न्यानको कंपनी समोर माथाडीच्या बोगस पावत्या बनवुन पैसे वसुल करत असल्याचे फोटो व व्हिडीओ काढल्यामुळे एका पत्रकाराला अडवून शिवीगाळ व दमबाजी करत त्या पत्रकाराच्या मोबाईल मधील व्हिडिओ शूटिंग व फोटो डिलीट करण्याची घटना घडली असुन त्या संबंधित पत्रकाराने याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन अजित इटनर व अन्य दोन जणांविरोध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पत्रकार हा आज 10:45 च्या सुमारास रांजणगाव MIDC तील ढोकसांगवी गावच्या हद्दीत असणाऱ्या न्यानको कंपनी समोरुन जात असताना पांढऱ्या रंगाच्या कार मधुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला अडवून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यातील एकजण जवळच असलेल्या झाडाची फांदी मोडून फिर्यादीच्या अंगावर धावून आला. त्यानंतर दुसऱ्या एका चारचाकी गाडीतून अजित इटनर हा आला आणि त्यानेही या पत्रकारास दमदाटी केली.
तसेच तु कोणाला विचारुन फोटो आणि व्हिडिओ काढले. असे म्हणतं मोबाईल मधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. तसेच यापुढे गावात यायचं असेल तर सरपंचांला विचारुन यायचं नाहीतर हातपाय काढु तु परत माघारी जाणार नाहीस अशी धमकी दिली. त्यामुळे अजित इटनर आणि इतर दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…