महाराष्ट्र

पोलिस भरतीची ‘लेखी परीक्षा’एप्रिलमध्ये होणार का…?

तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष

औरंगाबाद: राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार ‘लेखी’साठी निवड होणार आहे. त्यानुसार एक लाख ८३ हजार ३१० उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. पण, तृतीयपंथींची ‘मैदानी’ झाल्याशिवाय पोलिस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेताच येणार नाही. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

समितीचा अहवाल अजूनही तयार नाही तृतीयपंथींच्या मैदानीचे निकष ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीने ३१ जानेवारीपर्यंत निकष ठरवून गृह विभागाला देणे अपेक्षित होते. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत त्यासंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार होता. पण, अजूनही तृतीयपंथींना मैदानी चाचणीसाठी किती मीटर धावावे लागेल, गोळाफेक किती मीटर जायला हवा, चालक पदासाठी कोणते निकष, असतील हे निश्चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी एक महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

57 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago