राहुरी (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर ७ ते ८ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास वैराळ असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जणांनी एका इमारतीसमोर वैराळ यांना घेरून कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे राहुरीसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याचे नेमके कारण काय, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ४ जणांसह ११ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
मारहाणीत विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण काय होते, तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप का केला नाही, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…