महाराष्ट्र

आखाती युद्धाची झळ भारतात; गॅस टंचाईवरून रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या ११ दिवसांच्या भीषण युद्धाची झळ आता सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू लागली आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची स्थिती गंभीर बनल्याने तेथून भारताला होणारा खनिज तेल (क्रूड ऑइल) आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशभरात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पुढील काही दिवस युद्ध सुरूच राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही सरकारवर टीका सुरू केली आहे. गॅस टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला आहे.

या संदर्भात बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील सामान्य नागरिकांवर होत आहे. मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई निर्माण झाली असून मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये गॅसअभावी हॉटेल्स आणि खानावळी हळूहळू बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

मुंबई-पुणे आणि परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गॅस टंचाई कायम राहिल्यास विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पुढील काळात घरगुती गॅसचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केंद्र सरकारशी चर्चा करून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, गॅस टंचाईचा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. गॅसअभावी अनेक हॉटेल्सना मेन्यू कार्डमध्ये बदल करावा लागत आहे. एकाचवेळी शिजवून तयार करता येणारे पदार्थच ग्राहकांना दिले जात असून ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ देणे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, सध्या इडली किंवा वडा यांसारखे काही पदार्थ उपलब्ध होऊ शकतात, मात्र डोसा सारखे पदार्थ देणे कठीण झाले आहे. पुढील दोन दिवसांत गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही तर पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago