क्राईम

शिरुर मध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरुन महिलेसह तिच्या पतीस मारहाण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील हुडको कॉलनीत उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या पतीला स्टम्प व बॅट तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत करुन “तु परत इकडे आला तर तुला संपवुन टाकेन” अशी धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन हबीब सय्यद रा. शिरुर (ता. शिरुर), जि.पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि १७) रोजी सकाळी ११ च्या सुमारास शिरुर येथील हुडको कॉलनीत हबीब सयद याला एका महिलेने “तु आमचे पैसे का देत नाही, फोन का उचलत नाही, आमचे नंबर का ब्लॉक केले असे विचारल्याच्या कारणाचा राग मनात धरुन तिला आणि तिच्या पतीला घरासमोरील लाकडी स्टम्प व बॅट, तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण दुखापत करून ‘तु परत इकडे आला तर तुला संपवुन टाकेण’ अशी धमकी दिल्याने संबंधित महिलेने शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago