शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे बोअरच्या पाण्याच्या वादातून वडिलांना केलेल्या दमदाटीचा जाब विचारल्याने भावाकडून बहिणीला बेदम मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सोमनाथ डफळ, केतन सोमनाथ डफळ, सोमनाथ पांडुरंग डफळ, रोहिणी भोंडवे व लता सातकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
धामारी (ता. शिरुर) येथील अरुणा शिर्के या तिच्या आई वडिलांकडे राहत असून त्यांचा भाऊ केतन याने बोअरच्या पाण्यावरून वडील सोमनाथ यांना दमदाटी केली असता अरुणा यांनी वडिलांना दमदाटी केल्याचा जाब विचारला असता केतन डफळ यांच्या अन्य भाऊ व नातेवाईकांनी मिळून अरुणा यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठी तसेच चुली समोर असलेल्या लोखंडी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत अरुणा शिर्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
याबाबत अरुणा सुदाम शिर्के (वय ४२) रा. वरचा मळा धामारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी किशोर सोमनाथ डफळ, केतन सोमनाथ डफळ, सोमनाथ पांडुरंग डफळ तिघे रा. धामारी (ता. शिरुर) जि. पुणे, रोहिणी भोंडवे रा. लोहगाव ता. हवेली जि. पुणे, लता सातकर रा. सातकर स्थळ ता. खेड जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गणेश सुतार हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…