महाराष्ट्र

चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

जामखेड: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी खर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

रूपालीचा पती नाना प्रकाश उगले, प्रकाश पंढरीनाथ उगले, मनीषा शिवाजी टाळके, शिवाजी गोरख टाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत करत आहेत. रूपाली हिचे आठ वर्षांपूर्वी नाना पंढरीनाथ उगले (रा. नायगाव) याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. दोन-तीन वर्षांनंतर रूपालीस सासरच्या लोकांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षांपूर्वी रूपालीची सासू मयत झाल्यानंतर तिच्या घरातील कामे करण्यावरून, विहीर खोदण्यासाठी, घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तिचा छळ होत होता.

पैशासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास होत होता. नणंद मनीषा शिवाजी टाळके ‘भावाला दुसरे लग्न करून देईन, तुला काही कामे येत नाहीत म्हणून सतत टोमणे मारत होती. ८ जुलै रोजी सायंकाळी नायगाव येथील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago