ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण
शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी बापूराव बहिर हे बांधकाचे ठेके घेऊन काम करतात त्यातून त्यांची ऋषिकेश दरेकर याच्याशी ओळख झालेली आहे. 22 मार्च रोजी बापूराव यांना ऋषिकेश याने फोन करुन सणसवाडी चौकात बोलावून घेतले, काही वेळाने ऋषिकेश व रतन दोघांनी कार मधून सदर ठिकाणी येऊन बापूराव यांना आमच्या गावात काम करतो आम्हाला महिन्याला 20 हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनतर बापूराव यांना कार मध्ये बसवून सराटे वस्ती येथे घेऊन जात त्यांचे हात बांधून शिवीगाळ, दमदाटी केली.
दरम्यान बापूराव यांची त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी पैसे देण्याचे कबूल करत हात सोडून पळून जात शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या प्रकारा बाबत बापूराव आश्रुबा बहिर (वय ३८) रा. रामनगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व रतन दत्तात्रय कामठे रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…